चर्चमधील कन्फेशन प्रथा बंद करण्यास ख्रिश्चन समाजाचा विरोध

नवी दिल्ली : चर्चमध्ये चुकीबद्दल द्याव्या लागणाऱ्या कन्फेशन (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) मुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून, अशा कन्फेशनचा गैरफायदा चर्चमधील अधिकारी घेत आहे. त्यामुळे ती प्रथा बंद करण्यात यावी. अशी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे.त्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची पद्धतच बंद करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. मात्र ही प्रथा बंद करण्यास ख्रिश्चन समाजाने विरोध केला आहे. शोषण करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करा, पण धर्मातील अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, अशी भूमिका ख्रिश्चन समाजाने घेतली आहे.

दरम्यान केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्सो कन्ननदनम यांनी ही आयोगाची भूमिका असून केंद्र सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.चर्चमध्ये चुकीबद्दल द्याव्या लागणाºया कन्फेशनमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा कन्फेशनचा गैरफायदा चर्चमधील अधिकारी घेत आहे. त्यामुळे ती प्रथा बंद करण्यात यावी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले होते. अशा प्रकारानंतर महिला आयोगाने चौकशी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल व शिफारशी आयोगाने पंतप्रधान, गृहमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री तसेच केरळ व पंजाब या राज्यांचे पोलीस महासंचालक यांना दिला आहे.