कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना ‘पोटशूळ’ : राष्ट्रवादी कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना ‘पोटशूळ’ उठला असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विरोधकांना म्भाहणजेच भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने सादर करण्यात येणारा यंदाचा अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देणारा आहे. यातच आज कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी विधानसभेत जाहीर होणार म्हटल्यानंतर आज सकाळपासूनच विरोधकांना पोटशूळ उठला. ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’, अशा अविर्भावात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार यांनी विधानभवनात प्रवेश करताच रंग दाखवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.

Loading...

अवघ्या राज्याचे लक्ष्य लागलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषद सभागृहात जाणीवपूर्वक गदारोळ केला. या गोंधळातच पुरवणी मागण्या पटलावर मांडाव्या लागल्या आणि विधानपरिषदेचे कामकाज तेराव्या मिनिटालाच गुंडाळावे लागले. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा होती.

पण विरोधक सदस्यांकडून झालेला गोंधळ विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला अशोभनीय आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्या फडणवीस सरकाने शेतकऱ्यांना फसवले नसते तर आज पायऱ्यांवर बसून रंग दाखवण्याची ही वेळ आली नसती, असा टोलाही यावेळी राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे