सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या विरोधात विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेससह विरोधीपक्षांच्या ७१ खासदारांच्या सह्या असलेला प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

कालच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात फेर चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. यानंतर मिश्रा यांच्या विरोधात कॉंग्रेससह विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात आली असून देशाच्या न्यायव्यवस्थेला धोका असल्याचा आरोप करत कॉंग्रेसकडून महाभियोग प्रस्ताव आणला जात आहे. आता यावर राज्यसभेचे अध्यक्ष असणारे व्यंकय्या नायडू नेमका काय निर्णय घेतात हे पहाव लागणार आहे.

You might also like
Comments
Loading...