विरोधक रस्त्यावर आणि सत्ताधारी मात्र एकत्र….

इंधन दरवाढीविरोधात देशभरात विरोधकांनी एकत्र येत भारत बंदची हाक दिली आहे. देशभरात भाजप विरोधात जागोजागी आंदोलने चालू आहेत. देशभरातून २१ विरोधी पक्ष या बंद मध्ये सहभागी आहेत. या बंदवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधारी भाजपावर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. ”भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणाऱ्या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले.

एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोघेही एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. भारतीय पोस्ट विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेऊन, आज त्यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...