आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :
– मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
– मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
– राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
– आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
– मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
– अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

 

bagdure

जातीपातींचा अंत होणे शक्य नाही : विनायक मेटे

You might also like
Comments
Loading...