fbpx

एकाला मत दिल्यावर दुसऱ्याला जातं ; इव्हिएम मशीनवरून पुन्हा वाद

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर अंदाधुंद टीका करताना दिसत आहेत. त्यात आता पुन्हा इव्हिएम मशीनवरून नवा वाद सुरु झाला आहे. इव्हिएम च्या मुद्द्यावर विरोधक एकत्र आले असून त्यांनी इव्हिएम मशीनमध्ये बिघाड असल्याचा आरोप केला आहे.

आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेवेळी इव्हिएम मशीनवर चर्चा करण्यात आली. यावेळी आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू, आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह काही नेते उपस्थित होते.

दरम्यान, केजरीवाल यांनी इव्हिएम मशीनमधील काही बटन खराब असल्याचे सांगत ज्या ठिकाणी भाजपचं  वातावरण नाही तिथे मशीनमध्ये बिघाड केले जातात असा गंभीर आरोप केला.