fbpx

मोदी सरकारची सत्ता उलथून लावण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र

sharad pawar1

नवी दिल्ली : मोदी सरकारची सत्ता उलथून लावण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. देशभरातील राजकीय पक्षांची नेते ध्येय ‘लोकसभा २०१९’ मैदानात उतरले असून त्यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. मुंबईत झालेल्या संविधान रॅलीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांसोबत बैठक घेतली. यामुळे मोदी सरकारविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी विरोधकांकडून चालू आहे. दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील विविध ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे.पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जनता दलाचे शरद यादव, माकप नेते टी. के. रंगराजन, डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, माजिद मेमन, डी.पी. त्रिपाठी, तारीक अन्वर उपस्थित होते.