मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला उद्धव ठाकरेंचा विरोध

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपची जरी युती असली तरी सेना आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे भाजपच्या अनेक मतांशी सहमत आहेत, परंतु काही मुद्द्यांवर मतभेद अजूनही कायम आहेत असं स्पष्ट झाले.

‘कॉंग्रेसमुक्त भारत’ झाल्यास देशातील सगळे प्रश्न सुटतील का ? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले ‘भाजपच्या  कॉंग्रेसमुक्त भारत या भूमिकेला आपला विरोध आहे’. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा’. पुढे बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्र्यांवर जेवढी जबाबदारी असते तेवढीच जबाबदारी विरोधी पक्षावर सुद्धा असते. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त केले आहे.