….पावसाळी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे : खासदार अमर साबळे

amar-sable

टीम महाराष्ट्र देशा : या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या देश हिताच्या निर्णयांना विरोधकांनी कोणतेही राजकीय स्वार्थ आडवा न आणता सहकार्य करून हे पावसाळी अधिवेशन यशस्वी पार पाडावे, असे नम्र आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले आहे.

Loading...

संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून (दि.18 जुलै) सुरू होत आहे. संसदेचे मागील अधिवेशन विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे वाया गेले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार अमर साबळे यांनी विरोधकांना आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, सव्वाशे करोड भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून आपण संसदेमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन धोरण, योजना मांडून त्या मंजूर करून राबवित असतो. मात्र अनेकदा विरोधक फक्त राजकीय स्वार्थापोटी अनेक चांगल्या धोरणांना विरोध करतात. त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे कित्येकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात येते. मागील उन्हाळी अधिवेशनात कामकाजाचे शेकडो तास अशाच प्रकारे वाया गेले होते.

या वाया जाणाऱ्या वेळेमुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा तर होतोच त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने सुचविण्यात येणाऱ्या चांगल्या धोरणांना विरोध करून एकप्रकारे देशाच्या विकासाला खीळ बसविण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येते.

विरोधकांनी फक्त विरोधाला विरोध असे राजकारण न करता देशाच्या विकासाच्या दृष्टीने सुचविण्यात येणाऱ्या चांगल्या निर्णयांना व धोरणांना पाठींबा द्यावा. आणि संसदेचे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी खासदार साबळे यांनी केले.

अतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...