fbpx

सत्तेसाठी विरोधकांची जुळवाजुळव, तर भाजपने काढला मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त?

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, तर चार दिवसांनी २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी भाजपकडून ‘अबकी बार ३०० पार’चा नारा देण्यात आलाय. तर विरोधकांनी देखील बिगर भाजप सरकारसाठी जुळवाजुळव सुरु केली आहे.

निकालानंतर धावाधाव करायला लागू नये, यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यानी २३ मे रोजीचं सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नायडू यांनी काल एका दिवसात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

दुसरीकडे भाजपला मात्र पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्वास आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. 23 तारखेला एनडीएला बहुमत मिळाल्यास 26 अथवा 28 मे रोजी शपधविधी होऊ शकतो.