fbpx

सत्ताधाऱ्यांचा मंत्रिमंडळ विस्तार, तर अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकटवले

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या पावसाळी अधिवेशन आधी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी धनंजय मुंडेंंच्या घरी उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली आहे. या बैठकीत उद्याच्या अधिवेशना बाबत चर्चा होत आहे. यांनतर पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवर उपस्थित आहेत.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न झाला. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश होता. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे.