fbpx

‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल’

radha krushn vikhe patil leader of opposition

वेबटीम/मुंबई : शिवसेनेला कोणी काही बोललं की ते लगेच  नाराज होतात. त्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी मलिष्का बोलल्यानंतर ज्या तत्परतेने  तिच्या घरी गेले त्याच तत्परतेने त्यांनी मातोश्रीवरही जायला पाहिजे. त्यानंतरच मग महापालिकेवर भरोसा आहे का ?  हे  सेनेला मिळाले असते म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

आर जे मलिष्कावरुन झालेल्या वादाचा दाखला देत विखे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी मलिष्कावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. ही एखाद्या पक्षाची दिवाळखोरीच म्हणावी लागेल.

विखे पाटील यांनी पुढे बोलताना ‘सोनू’ गाण्याच्या स्टाइलने ‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल’ असा टोलाही लगावला आहे . विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवगळता उर्वरित विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.