पुण्यात कोरोनाचे थैमान, राष्ट्रवादीच्या धडाडीच्या महिला नेत्या अडकल्या विळख्यात

ncp9_

पुणे : पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच महापालिकेतील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीला पुणे महापालिकेतील सर्वच पक्षांचे गटनेते उपस्थित होते. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला होते. या बैठकीला या महिला नेत्याने देखील हजेरी लावल्याचे समोर आले आहे. न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, या महिला नेत्याला करोनाची लागण झाल्याने त्या बैठकीला हजर असणाऱ्या इतर नेत्यांनी देखील चांगलाच धसका घेतला आहे. आज पालिकेत कोणताही मोठा नेता फिरकला नाही.पुण्यात कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत आहेत पण हे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

महाराष्ट्रात येतोय परप्रांतीय मजुरांचा लोंढा, पोलिसांकडून घेतली जात आहे योग्य खबरदारी

दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यात काल (17 जून) दिवसभरात 550 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 444 रुग्ण हे पुणे शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 235 वर पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 15 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 553 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 117 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

खबरदार शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँक मॅनेजरला झोडपून काढणार