मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. जर कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अशातच आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे.
भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition Pravin Darekar) यांनाही कोरोनाने गाठले आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.’ अशी माहिती दरेकर यांनी ट्वीट करत दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022
दरम्यान, काल ४ जाने.)सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तर आत्तापर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील आदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
- “झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा”, आ. भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी
- “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<