विरोधी पक्ष नेताचं सत्ताधारी पक्षात पळतोय, मग जनतेचे प्रश्न कोण मांडणार : राज ठाकरे

raj-thackeray

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सांताक्रूझ येते विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी राज्याला आता प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याची मागणी केली. जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होणार नाही तो पर्यंत जनतेचे प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेला विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्या असे आवाहन केले.

यावेळी ठाकरे म्हणाले की, आज राज्याला विरोधी पक्षाची गरज आहे. कारण विरोधी पक्ष नेतेचं भाजपात पळत आहेत. जर विरोधी पक्ष नेताच पळत असले तर जनतेचे प्रश्न कोण मांडणार? त्यामुळे मी या विधानाभेला तुमच्या समोर इतिहासात कोणीही न घेतलेली भूमिका घेऊन आलोय. विरोधी पक्षाची धुरा माझ्या उमेदवारांच्या हातात द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्यावरून भाजपला लक्ष्य केले. देशात बँक घोटाळे होत आहेत. लोकांना हक्काचे पैसे मिळत नाही. माणस रडतायत तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडत नाही. कारण बँकेच्या अधिकार पदावर भाजपचीचं माणस आहेत. आज शेतकरी आणि कामगार ओरडतायतं, विद्यार्थी ओरडतायत, मात्र राजकीय पक्ष आणि सत्ताधारी केवळ जाहीरनामे देतायतं, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या