मुंबईतील ‘नाईट लाईफ’बद्दल अमृता फडणवीसांची लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाल्या…

टीम महाराष्ट्र देशा : आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणं आवश्यक आहे. ‘महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Loading...

तसेच माझ्या सारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची गरज असते. त्यांना फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर फोन टॅप प्रकरणावर म्हणाल्या की, या तिघा पक्षांना भाजप नकोय, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करतायत. आणि आधीच्या सरकारमध्ये शिवसेना देखील होती त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल. एकंदरीत सगळ्याच विषयावर अमृता यांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.

दरम्यान, शरद पवार सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल, यामध्ये काही तथ्यही नसेल असं वाटत आहे, असं त्या म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्यांवर भाष्य केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'