fbpx

लोकसभेचे अधिवेशन काही तासांवर येऊन ठेपले तरीही विरोधक सुस्तचं

loksabha

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अधिवेश उद्या पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळाची जय्यत तयारी झाली असून विरोधकांमध्ये कमालीची नाराजी दिसत आहे. कारण अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएने काल बैठक बोलावली होती, मात्र विरोधी पक्षांकडून अशी कोणतीच हालचाल दिसत नाही.

लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी.एन. पुनिया यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसला आहे. आता सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होत असली तरी पराभवाच्या धक्क्यातून विरोधी पक्ष अद्याप सावरलेले नाहीत. त्यामुळे संसदेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याची पुरेशी तयारीही विरोधी पक्षांनी केलेली नाही.