देशातील विरोधी पक्ष क्षीण, शिवसेनेच्या सामनाचा काँग्रेसला ‘हा’ खोचक सल्ला!

soniya and rahul gandhi

मुंबई : देशात सद्या अशांतता पसरत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे बेरोजगारीचा वाढता प्रश्न, शेतकऱ्यांना सोसावा लागणार आर्थिक फटका, डुबणारे उद्योग धंदे, सरकारचे जनहितविरोधी काही निर्णय यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारसह देशातील विरोधी पक्षांना फटकारे मारण्यात आले आहे.

देशातील प्रमुख विरोधी पक्षामध्ये काँग्रेस पक्ष येतो, जो आज राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सामील असून शिवसेनेच्याच सत्तेचा भाग आहे. देशातील परिस्थितीला जितका सत्ताधारी पक्ष कारणीभूत असतो, तितकाच विरोधी पक्ष देखील! त्यामुळे विरोधी पक्षाचा सरकारवर दबाव असणे गरजेचे आहे. मात्र, २०१४ पासून उतरती कळा लागलेला काँग्रेस पक्ष अजूनही नवसंजीवनीच्या प्रतीक्षेत आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखातून देशातील बेरोजगारी, कांदा निर्यात बंदी मुळे पाकिस्तानचा होणारा फायदा, शेतकरी आंदोलने यावर भाष्य करण्यात आले आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला खोचक सल्ला देखील आजच्या सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

“कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. हे सगळे विषय गंभीर आणि चिंताजनक आहेत. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.” असा सल्ला सामनाने विरोधी पक्षाला देतानाच सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या