fbpx

साध्वी प्रज्ञासिंहच्या शपथविधीवेळी सभागृहात विरोधकांकडून गोंधळ

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे पहिले अधिवेशन आज पासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवोदित खासदारांना शपथ देण्यात आली. तर यावेळी भोपाळ लोकसभेच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देखील घेतली. मात्र साध्वी ठाकूर शपथविधीला जाताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेण्यासाठी आल्या असता विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावास आक्षेप घेतला. प्रज्ञासिंह या संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये आपले नाव उच्चारताच विरोधी पक्षांकडून विरोधात सुरुवात झाली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घेताना केवळ स्वत:चे नाव घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.

यावेळी मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी, असा नामोल्लेख प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला शपथविधी थांबवला. त्यानंतर लोकसभेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना शपथेदरम्यान वडीवडिलांचे नावही घेण्यास सांगितले. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतानाही गोंधळ झाला.