fbpx

‘पंकजा मुंडेंवर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात विरोधकांना नोकरीच मिळत नाही’

टीम महाराष्ट्र देशा- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात विरोधकांना नोकरीच मिळत नाही, अशी घणाघाती टीका कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पवारांनी मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळू दिले नाही असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी देवळा आणि पुस तालुक्यात अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.खोत म्हणाले,पंकजा मुंडेंनी कुठलाही भेदभाव न करता सर्व समाजाला समान न्याय दिला असून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योजगान अभूतपूर्व आहे, अशा शब्दात खोत यांनी पंकजा मुंडे यांच्या कामाचे कौतुक देखील केले.

नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर संकटे असो शेतकर्यांच्या मदतीला धावून येणारे हे सरकार असल्याने लोकांनी आता वैचारिक पातळीवर विचार करावा. पवारांनी मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळू दिले नाही असा आरोप देखील त्यांनी केला.