fbpx

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचं काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे.

शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे. दरम्यान राधामोहन सिंह यांच्या या बेताल वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. सिंह यांचे विधान ऐकल्यास हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे हे लक्षात येईल. ही असंवेदनशीलताच शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडतेय अशी टीका  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

1 Comment

Click here to post a comment