शालेय लैंगिक शिक्षणाला संघाच्या न्यासाचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारच्या वतीन तयार करण्यात आलेल्या, आगामी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा नव्याने अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने कडाडून विरोध केला आहे.

शाळेत विज्ञान विषयात मानवी शरीराबद्दल पुरेशी माहिती असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्या लैंगिक शिक्षणाची आवश्यकता नाही. असा अभ्यासक्रम आला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होईल, असं मत, RSS न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे संबंधित समितीने सादर केला असून, त्यात लैंगिक शिक्षणा बरोबरच, महिलांचा सन्मान, सुरक्षितता, कुटुंब नियोजन, याबरोबरच लैंगिक अत्याचा, त्यानंतरची मदत आणि उपाय योजना आदी विषयांवरची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना लैंगिक विज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने केंद्राकडून माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा नव्याने अंतर्भाव करण्यात आला आहे.