गणेशोत्सवाचा त्रास, तर मग सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला ?

पुणे : दहीहंडी व गणेशोत्सव दरम्यान डॉल्बी व डीजे ला बंदी घालण्यात आली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील डीजे लावायला परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली नव्हती. मग, सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला ? असा प्रश्न पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीने उपस्थित केला.

येत्या 29 ते 31 डिसेंबर दरम्यान बावधान पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी व गणेशोत्सव सणादरम्यान मोठ्या आवाज चालणार नाही म्हणून डॉल्बी व डीजे ला बंदी घातली होती. मात्र, या फेस्टिव्हलमध्ये वेळेची, आवाजाची कसलीही मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे अश्या फेस्टिव्हला कायदेशीर परवानगी देऊ नये. या मागणीसाठी समिती तर्फे पोलीस भेट घेतली जाणार आहे. त्यानंतरही या कार्यक्रमास परवानगी दिल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा समितीचे राहुल म्हस्के यांनी दिला .

मात्र, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुणे शहरात दहीहंडी व गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषणाचे कारण समोर करून निर्बंध घातले होते. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर ही गुन्हे दाखल केले होते. मग आता हा नियम का नाही. असा ही सवाल समितीने या वेळी केला.

12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना !