पुणेकर ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी!

ऋतुराज-गायकवाड

मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या  संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.

या संघात मराठमोlळा खेळाडू पुणेकर ऋतुराज गायकवाडची  निवड करण्यात आलेली आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याची संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराजने चेन्नईकडून खेळताना आपल्या बॅटिंगची प्रतिभा आणि क्षमता दाखवून दिली आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. क्षीलंका दौऱ्यात या खेळाडूवर आता मोठी जबाबदारी असेल.

मराठमोळ्या ऋतुराजने आयपीएलच्या मोसमात आपले कौशल्य दाखवून दिले. ऋतुराजने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सलग 3 अर्धशतक ठोकत आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. ऋतुराजने या 14 व्या मोसमातील 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 25 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 196 धावा केल्या.

मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन , संजू सॅमनस , युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP