विरोधकांना बजेटमध्ये कधीच चांगलं दिसणार नाही – मुख्यमंत्री

cm in tension

टीम महाराष्ट्र देशा : विरोधकांना बजेटमध्ये कधीच चांगलं दिसणार नाही.अजूनही विरोधकांनी निर्माण केलेल्या समस्या आम्ही सोडवतो आहोत. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या बजेटवर दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करता त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. दारिद्र रेषेखालील लोकांना या अर्थसंकल्पात सरकारने स्थानच दिलेले नाही. त्याचबरोबर अनुसुचित जाती-जमातींसाठी गेल्यावर्षी केलेल्या तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात खूपच कमी निधी वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे सरकारने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सांगितले होते मात्र, प्रत्यक्षात २ लाख लोकांनाही रोजगार मिळालेला नाही. बेरोजगारांचे आकडे सरकार लपवित असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

तर या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हातात गाजराच्या पलीकडे काहीच मिळाल नाही, भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनेतेच्या हातात पुन्हा एकदा गाजरच दिले आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा करणारा आहे तसेच जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याच काम सरकारने केलं असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्या-ज्या योजना अर्थसंकल्पात आहेत त्या २०२२ आणि आणि २०२५ मध्ये पूर्ण होणार आहेत. असे असेल तर सरकारने मागील साडे तीन वर्षांत काय केले ? असा सवाल सुद्धा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला.