दूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर

कोंडीत सापडलेल्या जानकरांच्या मदतीला विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचा आजचा दिवस देखील वादळी ठरताना दिसत आहे, दूध दर प्रश्नावर मांडण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी उभा राहिलेल्या महादेव जानकर यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे.

शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी दूध उत्पादकांच्या समस्येवर लक्षवेधी दाखल केली होती, यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी कर्नाटक आणि गोव्यात दूध उत्पादकांना सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात अनुदान देण्यात येते. त्याच धर्तीवर राज्य सरकारने योजना राबवण्याची मागणी केली, तसेच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा मागणीही त्यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांना संपावर का जावं लागलं. सरकारने दुधाला २७ रुपये दर मान्य केला होता, परंतु हा दर अद्याप मिळू शकलेला नाही. दूध पावडर उत्पादकांना ३ रुपये अनुदान दिले, परंतु त्याची तरतूद अजून झाली नाही. पावडरचासाठाही संपला नाही. सरकारने घेतलेल्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्यांना अजून फायदा झाला नाही, असे अनेक आरोप अजित पवार यांनी यावेळी केले.

Rohan Deshmukh

दरम्यान, विधीमंडळ सभासदांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर जानकरांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही, यावेळी लक्षवेधी राखून ठेवण्याचा आग्रह विरोधकांनी विधानसभेत केला. त्यावेळी जानकर यांच्या मदतीला शिक्षणमंत्री विनोद तावडे धावून आले . पण विरोधक ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. सभागृहातला गोंधळ पाहता, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही लक्षवेधी राखून ठेवली.

हे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार

Latur Advt
You might also like
Comments
Loading...