कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले

dhananjay munde vr cm

मुंबई: विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांना काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, याची पूर्वकल्पना असूनही १ तारखेला जाणीवपूर्वक पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. असा आरोप धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप सरकारवर केला आहे.

भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का? कारण सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.असे, एकबोटे व मनोहर भिडे यांचे नाव न घेता धनंजय मुंडेनी सरकारला घेरले.

कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करत दंगल भडकवली. सरकारने एकबोटे व भिडे यांना लवकरात लवकर अटक करत निष्पाप लोकांवर ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घ्याव्या, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.