विरोधकांनी आम्हीच ज्ञानी आहोत असं समजू नये : विखे

टीम महाराष्ट्र देशा : काल भारताचा ७३ वा स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातचंं नाशिक येथील विभागीय महसूल कार्यालयात राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शासकीय झेंडावंंदन झाले. या कार्यक्रमानंतर बोलताना विखे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘राज्यात पूर परिस्थिती गंभीर असतांना सुद्धा,सरकार चांगलं काम करतंय. टिका करणे विरोधी पक्षाचे कामच आहे. हे समजू शकतो. मात्र केवळ आम्हीच ज्ञानी आहोत असे कोणी समजू नये अशा शब्दात विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच पालकमंत्रीपदाविषयी पालकमंत्री नेमणूक करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मला नाशिक अथवा नगर यातील कुठलीही जबाबदारी दिल्यास मी ती चांगल्या प्रकारे पार पाडून दाखवीन असं विधान केले.

तसेच राज्यातील महापुराविषयी बोलताना ‘पुरामुळं राज्यात मोठं नुकसान झाले आहे. शेती, पशुधन यांचं सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. याबाबत सरकार चांगले काम करीत आहे. यासंदर्भात सगळूयांनी धीर धरावा, यात राजकारण करू नये असंही विधान केले.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसमध्ये परंतु निवडणुकीनंतर त्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश करत मंत्रिपद मिळवले आहे. तसेच येत्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १२ जागा जिंकण्याचा निर्धारही केला आहे.