भाजपचा पराभव दिसणाऱ्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे

नागपूर : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, भाजपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवला असून यातही ज्यांना पराभव दिसत आहे, त्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करुन घ्यावे, असा खोचक सल्ला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आज भाजपने आसाम जिंकले, भाजपने पोंडीचेरी जिंकले, भाजपने पंढरपूर आणि बेळगाँव जिंकले, भाजपने बंगालमध्ये ३ वरून ७५+ जागा आणल्या. यातही ज्यांना भाजपचा पराभव दिसत असेल त्यांनी आयुष्मान भारत योजनेतून मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घ्यावे.’

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘२००+’ चा नारा दिला होता. मात्र, या ठिकाणी त्यांना १०० चा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे विरोधक भाजपवर टीका करत आहेत. मात्र, गेल्या वेळी केवळ तीन जागा असलेल्या बंगाल विधानसभेमध्ये यंदा भाजपने ७० च्या वर जागा मिळवल्या असल्याने भाजप आपल्या विजयाचा दावा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या