मोदी सरकारला घाबरून विरोधक राजीनामे देत आहेत : संबित पात्रा

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मोठे विधान केले आहे. मोदी सरकारला घाबरून विरोधक राजीनामा देत आहेत अस पात्रा म्हणाले आहेत. ते पुण्यातील देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार समारंभात बोलत होते.

संबित पात्रा यांनी उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींचे सरकार गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी निर्माण झालेले सरकार आहे. आताच्या सत्तेत गरिबांना लुटून आपण श्रीमंत होणार नाही, अशी भीती राजकीय पक्षाला बसली असल्याने राजकारणात अनेक वर्षे टिकून राहिलेल्या पक्षातील लोक मोदी सरकारच्या काळात घाबरून राजीनामे देत आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष आपली पिढी चालविण्यास असमर्थ ठरला आहे अस विधान केले आहे.

दरम्यान, पात्रा यांच्या हस्ते आज का आनंद समूहचे संस्थापक-संपादक श्याम आगरवाल यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दिव्य मराठी सोलापूरचे सिद्धाराम पाटील यांना युवा पत्रकार पुरस्कार, बारामतीचे शिवाजी गावडे यांना व्यंगचित्रकार पुरस्कार आणि हिंदुस्थान टाइम्स मराठीचे संपादक विश्वनाथ गरुड यांना सोशल मीडिया पुरस्कार प्रदान करण्यात आले.