केवळ माझा द्वेष करण्यासाठीच विरोधक एकत्र आले – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : केवळ माझा द्वेष करण्यासाठीच सर्व विरोधक एकत्र येत असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे. मात्र त्यांच्याकडे विकासाचा असा कुठलाच निश्चित कार्यक्रम नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे. मात्र आपण शहेनशहा वा घराण्याची सत्ता राबविणारा नेता नाही. मी लोकांतून निवडून आलेला प्रतिनिधी आहे, त्यामुळे माझी जनतेशी कायमच नाळ जोडलेली राहील.

देशाच्या विविध भागांत होणारे दहशतवादी हल्ले हा इतिहास झाला आहे, यूपीए सरकारच्या काळातच ते होते, असे सांगून जम्मू-काश्मीरमध्ये जबाबदार व उत्तरदायी प्रशासन देण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, नक्षलवाद्यांच्या हिंसाचारातही कमालीची घट झाल्याचा दावा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी आमच्या सरकारची भूमिका असून, पायाभूत सुविधा व सामाजिक विकास यालाच आमचे सदैव प्राधान्य असल्याचे यावेळी ते म्हणाले.

मोदींविरोधात बोलल्यामुळे बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

राज ठाकरेंनी उडवली नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली

भाजपने २०१९ मध्ये फटका बसेल म्हणून तोडली पीडीपीशी युती- आठवले