भविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करत भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावाही यांनी केला आहे. यापूर्वीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे भाजप सेनेच्या वाटेवर नक्की किती नेते आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुढे बोलताना, ‘आदित्य ठाकरेंचा दौरा कुठल्याही हेतूसाठी नाही किंवा कुठल्याही पदासाठी नाही, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.