विधानसभेत गदारोळ, भूखंड घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत दादांना विरोधकांनी पकडले कोंडीत

टीम महाराष्ट्र देशा : भूखंड घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांंवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. तर विधानसभेत विरोधकांनी भूखंड घोटाळ्यावरून गोंधळ घातला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून आमचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज सभागृहात चंद्रकांत पाटील उभे राहिले असता विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधाऱ्यांचा सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप देखील करण्यात आला. तसेच विरोधाकांडून होणाऱ्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले. या साऱ्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.
तसेच विधानसभेत काल राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केलेले आरोप विधीमंडळ पटलावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आज त्याच आरोपांना चंद्रकांतदादांनी सभागृहात उत्तर दिलं. त्यामुळे मग जयंत पाटील यांनी काल केलेले आरोप पुन्हा पटलावर घ्यावेत, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली. याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात आले.

Loading...

दरम्यान बालेवाडी येथे एक भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव होता. शिवप्रिया रिअॅलिटर्स उमेश वाणी यांनी ही जागा आपली असल्याची दाखवत प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. दरम्यान याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली परंतु चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सची असल्याचा निकाल देत जमिनीवर ३०० कोटींचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का