fbpx

धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधानपरिषदेत विरोधक आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मराठा आरक्षणा संदर्भात मोठी आणि अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांचे खंडपीठ आज या प्रकरणी निर्णय देणार आहेत. मात्र विधानपरिषदेमध्ये मराठा आणि धनगर आरक्षणावरून गोंधळ झाला आहे. यामुळे सभागृह हे तहकूब करण्यात आले.

विरोधकांनी मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्याना फैलावर घेतले आहे. भाजप सरकार हे धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावरून गृहीत धरत आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इतर मंत्र्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या दाव्याला दुजोरा देत सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाच्या सभापतींना सभागृह हे दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मराठा आरक्षणा संदर्भात मोठी आणि अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांचे खंडपीठ आज या प्रकरणी निर्णय देणार आहे.आतापर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात ४ याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामधील २ याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. तर २ याचिका समर्थनात आहेत. तर २२ हस्तक्षेप अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील १६ अर्ज हे आरक्षणाच्या बाजूने असून ६ अर्ज विरोधात आहेत. यासाऱ्याचा समग्र अभ्यास करून उच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे.