fbpx

फडणवीस सरकारमधील दीड डझनमंत्री भ्रष्ट्राचारी, सर्वांचे राजीनामे घेतल्याशिवाय राहणार नाही – मुंडे

oppisiton party press conferance before assembly session

टीम महाराष्ट्र देशा: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला आहे, भाजपचे १०, शिवसेना २ आणि आरपीआयच्या एका मंत्र्याचा शपथविधी पार पडला आहे, दुसरीकडे अर्धा डझन निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे, यामध्ये एफएसआय घोटाळ्याचा आरोप असणारे प्रकाश मेहता यांचा देखील समावेश आहे. विरोधी पक्ष नेत्यांकडून याच मुद्यावर सरकारवर टीका करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आभास निर्माण करत आहेत. प्रकाश मेहतांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, मात्र भाजप सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वांवर कारवाई करणे गरजेच आहे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आजवर झालेल्या सर्व अधिवेशानामध्ये विरोधी पक्षांनी मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे पुरावे सभागृहात मांडले आहेत, मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांना केवळ मंत्री पदावरून न काढता त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, तसेच सर्व भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

मंत्रीमंडळातून वगळण्यात आलेले मंत्री 

प्रकाश मेहता

राजकुमार बडोले

विष्णू सावरा

दिलीप कांबळे

प्रवीण पोटे

अमरिष अत्राम