‘ऑपरेशन कमळ’ फसले; पुन्हा शिवसेनेचा सामनातून भाजपावर निशाणा

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपा आणि शिवसेनेचा महायुतीसोबत चाललेला संसार अचानक मोडला अन शिवसेनेने विरोधी पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतच महाविकास आघाडीसोबत राज्यातील सत्ता स्थापन केली. त्यामुळे, महायुतीला बहुमत मिळून देखील भाजपाला १०५ आमदारांसोबत विरोधी बाकावर बसायला लागले. तर, विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी सरकारला वेळोवेळी अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असल्याने, या महाविकास आघाडीमध्ये एकमत नसून लवकरच हे तीनचाकी सरकार कोसळेल असे भाकीत भाजपाकडून केले जात असतानाच, सरकार स्थिर असून भाजपाने ते पाडून दाखवावे असे थेट आव्हानच शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतरही, सरकारच्या अनेक कामांवरून भाजपाने शिवसेना व त्यांच्या सत्तेतील मित्रपक्षांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. याला, महाविकास  आघाडीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलेले देखील दिसून आले असून ‘सामना’तून देखील तोफ डागण्यात आली.

यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच!

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये राजकीय खेळी करून सत्ता बदलानंतर राजस्थानमध्ये देखील घोडेबाजार करत भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याचे आरोप काँग्रेस नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत होता. मात्र, तेथील नाराजी शमत असून ‘ऑपरेशन कमळ’ फसल्याची टीका आता सामनातून करण्यात आली आहे. तर, भाजपा नेते नारायण राणे यांची देखील भोंदू डॉक्टर म्हणून खिल्ली उडवण्यात आली आहे. राणेंनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोसळेल असे विधान केले होते.

कोकणात गणेशोत्सवादरम्यान करणार २४ तास अखंडीत वीज पुरवठा: ऊर्जामंत्री नितीन राऊत

सामना अग्रलेखतील काही भाग-

राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ”सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा” या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच!

राज्यात एका दिवसात कोरोनामुक्तांचा आकडा १० हजारां पार, तर नवे रुग्ण इतके…