fbpx

IPLचा थरार आजपासून: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना

mi vs csk

टीम महाराष्ट्र देशा- दहा वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतरही या लीगच्या प्रेक्षकक्षमतेचा झरा आटलेला नाही. त्यामुळे चाहतेही आयपीएलचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला आजपासून (शनिवार) सुरुवात होत असून, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या माजी विजेत्यांचे पुनरागमन होत असल्याने त्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार खेळाचा मनमुराद आस्वाद लुटला जाणार आहे.

संघ : मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्तफिझूर रहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, इशन किशन, चहर, लेविस, तिवारी, कटिंग, संगवान, ड्युमिनी, आदित्य तरे, मार्कंड, धनंजय, अंकुल रॉय, मिचेल मॅक्लनघन, मोहसिन खान.

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, डुप्लेसिस, हरभजनसिंग, ड्वेन ब्राव्हो, वॉटसन, केदार जाधव, रायुडू, दीपक, असिफ, एन्गिडी, ध्रुव, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शर्मा, मोनू कुमार, बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर.

मोसम विजेते उपविजेते

२००८ राजस्थान, चेन्नई

२००९ डेक्कन ,बेंगळुरू

२०१० चेन्नई ,मुंबई

२०११ चेन्नई ,बेंगळुरू

२०१२ कोलकाता, चेन्नई

२०१३ मुंबई, चेन्नई

२०१४ कोलकाता ,पंजाब

२०१५ मुंबई ,चेन्नई

२०१६ हैदराबाद, बेंगळुरू

२०१७ मुंबई ,पुणे

८ – यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेले संघ.

६० – यंदाच्या स्पर्धेत होणाऱ्या एकूण लढती

स्पर्धा कालावधी – ७ एप्रिल ते २७ मे.

2 Comments

Click here to post a comment