उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश दिला आहे. या कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. पोलिसांचे विशेष पथक ग्रामीण भागात गावोगावी जाऊन स्वच्छते विषयी माहिती देऊन जनजागृती करणार आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. जे लोक उघड्यावर शौचास बसतील त्यांच्यावर त्वरीत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे उघड्यावर शौचास बसणा-यांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.