चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे रविवारी पोलिसांसोबत मुक्त संवाद

टीम महाराष्ट्र देशा : भोसरी, चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदस्यांबरोबर कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाचा मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम, रविवारी (दि. 25) सकाळी साडेनऊ ते दुपारी १ वाजेपर्यंत सिटी प्राईड स्कूल, रिव्हर रेसीडन्सी रोडसमोर, देहू-मोशी रोड, जाधववाडी चिखली या ठिकाणी होणार आहे. अशी माहिती चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.

मुक्त संवाद कार्यक्रमात चिखली, मोशी,जाधववाडी, च-होली, डुडुळगाव तसेच उर्वरीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील सदस्यांच्या कायदा व सुव्यवस्था, समस्या, अडचणीबाबत पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे.

प्रत्येक सोसायटीतील सदस्यांनी येताना आपल्या सोसायट्यांच्या व परिसरातील कायदा व सुव्यवस्थे बाबत समस्या,अडचणी यांचे लेखी निवेदन आणावे अशी सूचना करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या