fbpx

दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानांनी कायमचं चर्चेत असणारे दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिग्विजय सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा पक्ष देखील अडचणीत आला आहे.

दरम्यान दिग्विजय सिंग यांना कार्यकारिणीतून का हटवण्यात आले याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र आगामी मध्यप्रदेश निवडणुकीसाठी त्यांना वेळ देता यावा यासाठी इतर जबाबदाऱ्यातून त्यांना मुक्त केल्याचं काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.

तर राष्ट्रीय सरचिटणीस असलेले दिग्विजय सिंग गोव्याचे प्रभारी असताना सर्वाधिक जागा जिंकूनही सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आल होतं. तेव्हापासून काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळेचं त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकल्याची चर्चा आहे.

दरम्यान दिग्विजय सिंग यांच्याकडे असलेले आंध्र प्रदेशचे प्रभारीपद देखील काढून घेण्यात आले असून, त्यांच्याजागी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त केलंय.