Food hunter : मान्सून स्पेशल कांदा भजी

टीम महाराष्ट्र देशा : साहित्य : १ मोठा लाल कांदा, तिखट, मीठ – चवीप्रमाणे, बेसन अंदाजे लागेल तितके,तेल तळण्यासाठी,किंचित हळद, चवीसाठी चिमुटभर ओवा,स्वादासाठी कोथींबीर.

कृती :
कांदा उभा चिरून घ्यावा त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे. तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. तेल तापल्यानंतर त्यात मिश्रण चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात. खायला तयार आहेत गरमागरम कुरकुरीत कांदा भजी.

 

दिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू

Beauty tips- सौंदर्य वाढवण्यासाठी खास टिप्स

पाठदुखी मिनिटांत दूर करण्यसाठी

 

You might also like
Comments
Loading...