रॉजर फेडररने पुन्हा पटकावले ऑस्ट्रोलियन ओपनचे विजेतेपद

roger-federe

टीम महाराष्ट्र देशा: स्विझरलँन्डचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मरिन सिलिकला ऑस्ट्रोलियन ओपन स्पर्धेच्या पुरूष ऐकेरीच्या अंतिम सामन्यात पराभूत करून स्पर्धेचे विक्रमी सहव्यांदा विजेतेपद मिळवले.

या सामन्याच्या पहिल्या सेटमधे फेडररने सिलिकचा ६-२ असा सहज पराभव केला. या सेटमधे फेडररच्या फोर हँन्ड शाँट समोर सिलिकचा टिकाव लागला नाही. तर दुसऱ्या सेटमधे टाय ब्रेकरव सिलिकने आघाडी घेत हा सेट आपल्या नावे केला. तिसऱ्या सेटमधे फेडररने पुन्हा आघाडी घेत ६-३ असा विजय मिळवला.चौथ्या सेटमधे सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीत आला या सेटमधे सिलिक फेडररला भारी पडला व सेट ६-३ आशा फरकाने आपल्या नावे केला.

२-२ आशा बरोबरीत असलेला सामना पाचव्या सेटपर्यंत पोहचला.या सेटमधे फेडररने आपल्या धडाकेबाज खेळाने सिलिकला डोके वर काडू दिली नाही.हा सेट फेडररने ६-१ असा जिंकून, सामना ६-२,६-७,६-३,३-६,६-१ आशा फरकाने जिंकत ऑस्ट्रोलियन ओपनचे विजेतेपद सहव्यांदा आपल्या नावे केले.

फेडररचे ऑस्ट्रोलियन ओपनचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.यापूर्वी २००६ व २००७ साली फेडररने ऑस्ट्रोलियन ओपनचे सलग दोन वेळा विजेतेपद मिळवले होते.आजपर्यंत रॉजर फेडररने आजपर्यंत कारकिर्दीत २००४,२००६,२००७,२०१०,२०१७ व आता २०१८ साली ऑस्ट्रोलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.Loading…
Loading...