पुण्यात ऑनर किलिंग चा धक्कादायक प्रकार ; बहिणीला विधवा करणारा भाऊ पसार

टीम महाराष्ट्र देशा : भावानेचं आपल्या बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यातील कॅम्पमध्ये शनिवारी रात्री घडला. बहिणीने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात हा खून केल्याचे समोर आले आहे सुलतान महमंद हुसेन सय्यद (वय २४, रा. महंमदवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील मारझोरियन बेकरीजवळ शनिवारी रात्री सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानचा नारळ विक्रीचा व्यवसाय होता. त्याचा एक वर्षापूर्वी विवाह अरबाज कुरेशी याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह झाला होता. परंतु मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद देखील झाले होते. काल सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाले. आणि हे वाद एवढे विकोपाला गेले की, अरबाज व त्याचे दोन त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर रॅम्बो चाकूने सपासप वार केले. वार करून आरोपी तेथून पसार झाले. यामध्ये सुलतान गंभीररीत्या झाला. तेथील लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटने बद्दल सर्वच स्तरातून हालहाल व्यक्त केली जात आहे. पोलीस देखील आरोपींचा कसून शोध घेत आहेत.