विद्यार्थी शाकाहारी असेल तरच मिळेल सुवर्णपदक; पुणे विद्यापीठाचा फतवा

कीर्तनकारांच्या नावाने पदकासाठी अट

पुणे: तुम्ही जर शाकाहारी असाल तरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तुम्हाला सुवर्णपदक मिळू शकते. कारण कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी विद्यापीठाकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात ही अजब अट घालण्यात आली आहे. ही एकच अट नसून पत्रकात अटींची मोठी लिस्टच देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या पत्रकानुसार, विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असणार आहे. यसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा. त्याने भारतीय व परदेशी क्रीडा स्पर्धांत जास्तीत जास्त पारितोषिके मिळवलेली असावी. त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य असणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...