देशात फक्त दोनचं राज्यात राज्यपाल; संजय राऊतांचा भाजपला टोला

sanjay raut

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र हा त्याचाच एक भाग होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकच मारला, पण सॉलिड मारला, अशी टीका सामनातून काल करण्यात आली. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सारखे खटके उडत आहेत.

ठाकरे-राज्यपाल वाद अजून शमला नसल्याचं शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या वक्तव्यातून दिसून आलं. ‘राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात. कारण ते राजकीय काम करत असतात आणि सध्या संपूर्ण देशात केवळ दोनच राज्यांमध्ये राज्यपाल आहेत.’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

पुढे, “एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आहेत. देशातील या दोनच राज्यात विरोधी सरकार आहे. बाकी कुठे राज्यपाल आहेत का नाही मला माहिती नाही,” अशी टीका करत त्यांनी भाजपसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील कोपरखळी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या:-