‘फक्त या आठवणीच राहिल्या’ ; सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावुक करणारी पोस्ट

sushant ankita

मुंबई : १४ जुन २०२० म्हणजेच आजच्या दिवशी संपुर्ण बॉलिवुड जगताला हादरवुन टाकणारी घटना समोर आली. बॉलीवुड अभिनेता अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आज सुशांतच्या मृत्यूला वर्षपूर्ती झाली आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला होता. त्याच्या चाहत्यांना देखील याचा खूप मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, सुशांतची एक्स अंकिता लोखंडेने देखील सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. दरम्यान तिने मानव-अर्चनाच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानिमित्त तिने जुन्या आठवणींना उजाळा होता दिला.

आजच्या दिवशी देखील अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या अंकिताने सुशांत आणि तिचा एक डान्स करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला तिने भावुक करणार कॅप्शन देखील दिल आहे. ‘फक्त या आठवणीच राहिल्या.’ अंकिता सह अनेक कलाकारांनी देखील या दिवशी सुशांतच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP