…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी

raju shetti

टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली तरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल अन्यथा शेतकरी त्यांना बघून घेतील, असा धमकीवजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.येत्या २४ तारखेला अमित शहांचा कोल्हापूर दौरा आहे. त्यावरून आज राजू शेट्टी यांनी पुण्यात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले,राज्यातील १८८ साखर कारखान्यांपैकी केवळ १० टक्के कारखान्यांनी पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित ८० कारखान्यांनी २५ टक्के तर ७४ टक्के कारखान्यांनी एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे एकूण ७ हजार ४५० कोटी रुपयांपैकी २ हजार ८७४ कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोचले असून उर्वरित रकमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत, पत्रके पाठवली आहेत. हे सर्व कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी असे शेट्टी म्हणाले.

ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा दाखला देऊन, वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी तिजोरी रिकामी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असताना आता ती तिजोरी आणि तिची चावी कुठे आहे असा सवाल खासदार राजू शेट्टी त्यांनी विचारला. २४ तारखेला शहा यांचा दौरा सुरक्षित करायचा असेल तर त्याआधी एफआरपीची थकीत रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा शेतकरी त्यांना बघून घेतील असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.