fbpx

…तरच शिवसेना उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही – दिवाकर रावते

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जर लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली , तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही. त्यासोबतच, त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. त्यांनी जर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात नक्कीच शिवसेना उमेदवार देईल, असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हंटल आहे.

साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे खासदार होण्याला शिवसेनेची अडचण नाही. परंतु त्यांनी राष्ट्रवादीकडून त्यांनी खासदार व्हावे याला मात्र शिवसेनाचा विरोध आहे. त्यामुळेच दिवाकर रावते यांनी उदयनराजेंन ऑफरच दिली आहे. यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती पकड आहे. त्यानंतर ही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करत असतातच . अनेकवेळेला समोरच्या उमेदवारांचे अनामत रक्कम ही जप्त झाली आहे. मात्र, यावेळी अनेक पक्षांनी एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने उदयनराजेंविरोधातही साताऱ्यातून कुणी बलाढ्य उमेदवार उभा करेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक घोषणा केली आहे.