fbpx

‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’

टीम महाराष्ट्र देशा- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नोटबंदी, प्लॅस्टिकबंदी करत आहे, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी अनेक योजना काढत आहे. नोटबंदीमुळे सामान्य जनतेला त्रास सोसावा लागला. आजही अनेक शेतकऱ्यांकडे जुन्या नोटा आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांना फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार समजू शकतात आणि निर्णय घेऊ शकतील असा दावा आ. नरहरी झिरवळ यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना झिरवळ यांनी हा दावा केला आहे.दरम्यान,याच सभेत बोलताना विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले. नाशिककरांवर भाजप सरकारने अन्याय केला आहे. नाशिकचा एकही नेता मंत्रिमंडळात नसल्याने व्यथा मांडल्या जात नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करून सुद्धा कर्जमाफी दिली नाही. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जेव्हा कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी त्वरीत करून दिली होती. आर.आर पाटील यांच्या नेतृत्वात डान्सबार बंद करण्यात आले मात्र आज याच भाजप सरकारमुळे पुन्हा डान्सबार सुरू करण्यात आले आहेत. यामुळे परिवर्तन झालेच पाहिजे, असे पवार यांनी सांगितले आहे.

भारत समान विचारसरणीचा देश आहे. मात्र सध्या देशात प्रत्येकाची जात कुठली आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपच्या नेत्यांनी तर चक्क देवांची जात शोधायला सुरूवात केली आहे. भाजपची खासदार पूनम महाजन यांनी भगवान श्री राम उत्तर भारतीय असल्याचा दावा केला आहे. देशात रोजगार उपलब्ध नाही आहेत आणि सरकार वाढप्यांच्या नोकरीसाठी सुद्धा परीक्षा घेत आहे, अशा अनेक मुद्यांवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आहे.