fbpx

पारनेरला पाणी फक्त राष्ट्रवादीच आणू शकतं – निलेश लंके

स्वप्नील भालेराव /पारनेर : पारनेर तालुक्याची अवस्था दिवसेंदिवस अतिशय बिकट होत चाललीय. कारण ज्यांच्या हाती गेली पंधरा वर्षे सत्ता होती त्यांना पारनेर तालुक्यासाठी साधं पाणी आणता आलं नाही की काही साध्या भौतिक सुविधा व्यवस्थित करता आल्या नाहीत. पारनेरच्या शेजारचा बारामती पहा संगमनेर पहा सुधारणेच्या बाबतीत अव्वल आहे. मला ही वाटतं माझा तालूका सुधारावा. तालुक्यात शैक्षणिक संकूलं व्हावी , मोठे दवाखाने व्हावीत , चांगले रस्ते व्हावेत.

अशी मागणी नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी निर्धार परिवर्तन मेळाव्यात निलेश लंके यांनी बोलून दाखवली.  तेव्हा ह्या मागणीवर मा. धनंजय मूंडे म्हणाले की, निलेश तुमच्या नावातच नील आहे . नील म्हणजे पाणी नावातच पाणी आहे. पारनेरला निश्चितच पाणी भेटणार घाबरू नका. कारण राष्ट्रवादी ने एकदा शब्द दिला की तो शब्द तडीसच जातो.

 

1 Comment

Click here to post a comment